News

श्री अंबिका योग कुटीर तर्फे आकाशवाणी, अस्मिता वाहिनीवर आरोग्यदर्पन कार्यक्रम

PCOD - आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीतून ,स्पर्धात्मक वातावरणाने येणारे ताणतणाव व त्यातून उद्भवणारे व तरुणींना होणारे HORMONAL IMBALANCE ज्यात मासिक पाळीची अनियमितता ,स्थूलता ,चेहऱ्यावरील दाढी मिश्या व पुढे जावून वंध्यत्व ,मधुमेह इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 

जर जीवनशैली बिघडल्यामुळे रोग होत असतील तर जीवनशैली योग्य व निरोगत्व प्रदान करणारी असली पाहिजे. ही योगिक जीवन शैली आहे ज्यात यम नियम पालन मुख्यत्वाने येते . आहारविहार ,आचार विचार ह्यातून ताणतणावाचे होणार सुनियोजन ,शुद्धीक्रियांनी शरीर,मन व चित्त शुद्धी .आसनांनी लवचिकता सुदृढता येते व वजनावर नियंत्रण करता येते. 

मासिक पाळी सहजतेने नियमित होते व अंतर्गत बदल घडून रिपोर्ट्स नॉर्मल येतात हा कुटीरातील अनुभव आहे , आणि ह्या विषयाचे थेट प्रक्षेपण - श्री अंबिका योग कुटीर तर्फे आकाशवाणी, अस्मिता वाहिनीवर आरोग्यदर्पन कार्यक्रमात आज दुपारी साडेबारा वाजता PCOD व योग dial in program मध्ये झाले.

Go Back